जळगाव, प्रतिनिधी | ठरलेला कार्यकाळ पूर्ण झाल्याने महापौर सीमा भोळे यांनी ७ जानेवारी रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. महापौरांच्या रिक्तपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून सोमवार २७ जानेवारी विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले आहे.
नाशिकचे विभागीय आयुक्त यांनी महापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार कोरे नामनिर्देशन पत्र मंगळवार २१ जानेवारी ते २४ जानेवारी रोजी दुपारी १ वाजेपर्यंत नगरसचिव कार्यलयात मिळणार आहेत. नामनिर्देशन पत्र मंगळवार २१ जानेवारी ते शुक्रवार २४ जानेवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत दाखल करता येणार आहे. सोमवार २७ जानेवारी रोजी महापौर निवडीची विशेष सभा सकाळी ११ वाजता सुरु होणार असून त्याच दिवशी नामनिर्देशन पात्रांची छाननी करण्यात येणार आहे. छाननीनंतर १५ मिनिटाचा कालावधी माघारीसाठी असणार आहे. माघारीची वेळ संपल्यानंतर मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी पिठासीन अधिकार म्हणून जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे हे राहणार आहेत.