पंकजा मुंडे यांनी नवीन पक्ष स्थापन करावा !- एमआयएमचे खा. इम्तियाज जलील

औरंगाबाद-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । विधानपरिषदेत भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना संधी न मिळाल्याने त्यांचे समर्थक नाराज आहे. त्यात पंकजा मुंडे यांनी भाजपाला रामराम ठोकून नवीन पक्ष स्थापन केला तर महाराष्ट्रात मोठा भूकंप येईल सल्ला एमआयएमचे नेते खा. इम्तियाज जलील यांनी दिला आहे.

यावेळी खा. जलील यांनी सांगितले आहे की, विधानपरिषदेच्या निवडणूकीत तिकीट न दिल्यामुळे पंकजा मुंडे यांनी आता नव्याने पक्ष स्थापन करावा असा माझा सल्ला आहे. स्व. गोपीनाथ मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. ते राज्याचे गृहमंत्री असतांना त्यांनी अनेक चांगले कामे देखील केले आहे. जनता हे कामे विसरलेली नाही. त्यामुळे इतकी लाचारी कशासाठी ?. त्यांना पक्षाने तिकीट दिले नाही म्हणून दुसऱ्याची दिवशी पक्षाला रामराम ठोकून नव्या पक्षाची घोषण करावी, ओबीसी नेत्या म्हणून त्यांच्या मागे मोठी ताकद उभी राहिल असे देखील ते म्हणाले आहे. असे वृत्त टीव्ही ९ मराठीने दिले आहे.

दरम्यान, पंकजा यांना भाजपाने डावलल्यानंतर त्यांचे समर्थक प्रचंड नाराज आहेत. तर दुसरीकडे पंकजा मुंडे शिवसेनेत आल्या तर त्यांचं स्वागतच करु असं वक्तव्य शिवसेनेच्या नेत्यांनी केलं आहे. पंकजा यांना उमेदवारी न दिल्याने पाथर्डी येथील एका कट्टर मुंडे समर्थकाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. अशा घडामोडी घडत असताना पंकजा मुंडे पुढे कोणता राजकीय निर्णय घेणार असा प्रश्न विचारला जातोय.

Protected Content