जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने त्यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त महापौर जयश्रीताई महाजन यानी त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी मनपा शहर अभियंता एम.जी. गिरगावकर, शाखा अभियंता योगेश वाणी, महापौरांचे स्वीय सहाय्यक नितीन पटवे, सुरेश कोल्हे व मनपाचे कर्मचारी उपस्थित होते