महात्मा फुले हायस्कूल येथे सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त वृक्षारोपण 

धरणगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | धरणगाव शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे संतश्रेष्ठ – संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त वृक्षारोपण करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख एस.एन.कोळी यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पवार होते. प्रमुख वक्ते म्हणून शाळेतील आदर्श शिक्षक पी.डी.पाटील होते. मान्यवरांच्या हस्ते संत शिरोमणी सावता महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

पी.डी.पाटील यांनी संत शिरोमणी सावता महाराज यांचा जीवन पट उलगडला. महाराजांचे अभंग रचना आजही श्रेष्ठ आहेत. तसेच महाराजांनी आपल्या कर्मातच देव पाहिला आपण विद्यार्थ्यांनी देखील आपल्या पुस्तकांमध्ये देव पाहून उंच भरारी घ्यावी आणि आपल्या कुटुंबाची प्रगती करावी. सावता महाराजांच्या आदर्शानुसार अंधश्रद्धा, कर्मकांड, होमहवन, यज्ञ यापासून दूर रहावे. आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत असे प्रतिपादन पाटील यांनी केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पवार यांनी महाराष्ट्रातील संतांचे विचार आपल्यासाठी प्रेरणादायी आहेत. सातशे वर्षांपूर्वीचे विचार आज देखील आपल्यासाठी ऊर्जा देतात. यानंतर मुख्याध्यापक, शिक्षक बंधु -भगिनीं व विद्यार्थ्यांच्या हस्ते शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. महाराजांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून शाळेच्या परिसरात वृक्षांची लागवड करून खऱ्या अर्थाने आदरांजली वाहण्यात आली. यामध्ये नीम, करंज व अशोक वृक्षांचा रोपांचा समावेश आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख एस.एन.कोळी तर आभार सांस्कृतिक विभाग श्रीमती.एम.जे. महाजन यांनी केले.

Protected Content