नशिराबाद येथे शिरोमणी संत सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळा जल्लोषात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्या निमित्त बुधवार २७ जुलै रोजी सकाळी ९ वाजता मंदीरात विविध कार्यक्रमाचे आयेाजन करण्यात आले. यावेळी टाळ मृदंगाच्या गजरात वारकरी मंडळी भक्तीभावात गावातून दिंडीची मिरवणूक काढण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला श्री संत शिरोमणी सावता महाराजांच्या मुर्तीचा अभिषेक सपत्नीक कांचन व किरण सुरेश माळी यांच्याहस्ते करण्यात आला. रमेश पाटील यांच्याहस्ते पालखीचे पुजन करून दिंडी सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला.

या सोहळ्यात संस्थेचे अध्यक्ष सुनिलशास्त्री महाराज, माजी सरपंच विकास पाटील, माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, नशिराबाद शिक्षण मंडळचे कार्याध्यक्ष योगेश पाटील, शिवसह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश चव्हाण, माजी सरपंच पंकज महाजन, शिवसेना शहर प्रमुख विकास धनगर, माजी ग्रामपंचायत सदस्य नामदेव माळी, संदीप रणधीर, हभप रमेश पाटील, सुरेश माळी, सोपान महाजन, जगन पाटील, महेश माळी, दगा महाजन, सुधाकर महाजन, सजंय महाराज, तुळशीराम जगताप, सोपान शिवरामे, धनराज पाटिल, विठ्ठल माळी, मधुकर महाजन, प्रविण महाजन, अरूण पाटील, मोहन खारे, गणेश माळी व सुभाष माळी, सर्व भजनी मंडळ व महिला भजनी मंडळ उपस्थित होते.

मिरवणुक संत शिरोमणी सावता महाराज मंदिरापासून फुले चौक – मेनरोड -नाईक वाडा या मार्गे पालखीवर पुष्प वृष्टी करून भव्य स्वागत गावातील भाविकांनी केले व महादेव मंदिराजवळ दिंडीची सांगता करण्यात आली. यानंतर काल्याचे भजन द्वारे व महाराजांच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आला नंतर सर्वांनी महाप्रसादाचा स्वानंद घेतला.

या कार्यक्रमास सर्व मार्गदर्शन हभप सुनिल शास्त्री महाराज यांचे लाभले त्यास सचिव पंढरीनाथ पाटील, अशोक पवार, संतोष पवार, हेमराज महाजन, भगवान पाटील, विकास पाटील, आबा पाटील, तेजस माळी, पत्रकार सुनिल महाजन, हर्षल महाजन, सचिन महाजन, संदीप जगताप, निलेश महाजन, रितेश महाजन, सुपडू चौधरी, वासुदेव महाजन, सुनिल महाजन व कार्यक्रमासाठी सर्व भजनी मंडळी, स्वयंपाकी नामदेव गुरूजी माळी, प्रभाकर पवार, बाबूलाल महाजन, चंदू फेगडे सुधीर महाजन, काशिनाथ महाजन, संस्था पदाधिकारी, सदस्य,सर्व शाखा अध्यक्ष, युवक मंडळाचे कार्यकर्ते यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.

Protected Content