यावल प्रतिनिधी । तालुक्यातील कर्जबाजारीत अडकलेल्या बळीराजाला आधार देणारी राज्य शासनाच्या महत्वकांक्षी महात्मा ज्योतीबा फुले शेतकरी कर्जमुक्त योजनाही प्रत्येक पात्र असलेल्या शेतकऱ्यापर्यंत पहोचवावी या योजने संदर्भात विविध विषयांवर चर्चा व मार्गदर्शन करण्यासाठी प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी केले.
यावल पंचायत समितीच्या सभागृहात १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता प्रांत अधिकारी डॉ. अजीत थोरबोले यांच्या प्रमुख उपस्थितीत महात्मा ज्योतीबा फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेच्या अमलबजावणी संदर्भात तातळीची बैठक आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीत आपले सरकार सेवा केंद्र / सामुहीक सुविधा केन्द्र / बँकेचे शाखाचालक यांचेसाठी मार्गदर्शक सुचना देण्यासंदर्भात आयोजीत बैठकीत प्रांत अधिकारी डॉ.थोरबोले यांनी उपस्थित ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी, संगणकीय संचालक यांना गावनिहाय शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांची यादी फलकावर प्रसिद्ध करणे, पार्टलवर संबधीत शेतकरी यांना स्क्रिनवर दिसणारे मान्य, अमान्य पर्यायांबाबत अर्थ शेतकऱ्यांना समजवुन सांगणे, केंद्र चालकाने शेतकऱ्यांच्या तक्रारीची नोंद झाल्याबाबत व अशी तक्रार जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीकडे पाठविली असल्यास शेतकऱ्यास सांगावे व तक्रारीबाबतची संगणकीय छापील पत्र शेतकऱ्याना द्यावी, जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सुचनांनुसार तहसीलदार संबंधीत शेतकऱ्यांनी दाखल केलेले. आधार क्रमांक आदी कागदपत्रांची पडताळणी करावी अशा विविध विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी तहसीलदार जितेंद्र कुवर, सहाय्यक गटविकास अधिकारी एल.आय. तडवी यांच्यासह आदी अधिकारी उपास्थित होते.