मुलभूत सुविधेसाठी लाखाणी पार्क परीसरातील रहिवाश्यांनी मुख्याधिकाऱ्यांना धरले धारेवर ( व्हिडीओ )

Navapur

नवापूर प्रतिनिधी – नवापूर शहरातील लाखाणी पार्क परिसरात पिण्याचे पाणी व घंटा गाडी आणि अन्य सुविधा तात्काळ उपलब्ध करुन देण्याबाबतचे निवेदन आज मुख्यधिकारी राजेंद्र शिंदे यांना लाखाणी पार्क परिसरातील नागरीकांनी दिले आहे. त्यांनी यावेळी लाखानी पार्क रहिवासी परवेज लखानी, नासीर खान, राजक सैय्यद, इंद्रजित गावीत, प्रकाश खरमोळ, हॉबेल गावीत, दिलीप गावीत, गोविद चौधरी, जुबेर सैय्यद, जाकिर शेख, रशीदा खाटीक, रुबीना खाटीक, शाहीन आसीफ खाटीक, अजीम खाटीक, रशमीन शेख, फराज खाटीक, सायमा खाटीक, सोफीन खाटीक, ईशफान खान, इमरान खानसह ८६ लाखानी पार्क रहिवासी यांच्यासह रहिवाश्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

काय म्हणणे आहे रहिवाश्यांचे
नगरपालिकेला लाखाणी पार्क परिसरात मुलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने नागरीकांची अनेक वेळा निवेदन नगरपालिकेला देण्यात आले. मात्र ठोस असे कोणतीही कारवाई किंवा आदेश अद्यापर्यंत आलेला नाही, आजच्या घडीला मार्च महिना सुरु असतांना लाखाणी पार्क परिसरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर उपस्थित झाला आहे. लाखाणी पार्क परिसरात पिण्याच्या पाण्याची टंचाई झाली असल्याने आपल्या स्तरावरुन या बाबत नियोजन करुन टँकरने नियोजन करुन आम्हास नियमितपणे पिण्याचे पाणी उपलब्ध करुन दयावे, मागील दोन महिन्यांपासून घंटा गाडी येणे बंद झाले आहे. पर्यायाने घरातील केर कचरा उघडयावर टाकण्याची वेळ परिसरातील नागरीकांवर आलेली आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे. असा प्रकार झाल्यास सर्वस्वी जबाबदारी नगरपालिका प्रशासनाची असेल याची आपण नोंद घ्यावी. व या बाबीवर तात्काळ संबंधितांना निर्देश देऊन घंटा गाडी नियमितपणे येईल अशी सोय करावी. यापूर्वी परिसरातील जोडरस्ता व ड्रेनेज लाईन तयार करणे कामी नगरपालिकेत ठराव झालेला आहे. माञ झालेल्या ठरावाच्या अनुषंगाने इस्टीमेट तयार करणे आणि पुढील तांञिक मान्यता व प्रशासकीय मान्यता करुन घेणे या बाबी पूर्णपणे दुर्लक्षीत करण्यात आलेल्या आहेत. यामुळे या प्रकारणाची आपण चौकशी करुन सर्व संबंधीतांवर जबाबदाऱ्‍या निश्चित करण्याची प्रकिया आपण करावी ही देखील आपणास विनंती आहे लाखाणी पार्क परिसरात पिण्याची पाण्याची टाकी तयार असून सदर टाकी वापरण्याचे नियोजन यापूर्वीच झाले असते तर परिसरातील नागरीकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागले नसते.म्हणून आतातरी गांभिर्यपूर्वक विचार करुन सदर बांधण्यात आलेली पाण्याची टाकी तात्काळ सुरु करण्याची कार्यवाही करावी.उपरोक्त १ते ४ मुद्दयांच्या संदर्भात आपण विशेष लक्ष देऊन प्रथम प्राधान्याने या मुद्दयांची पूर्तता करण्यासाठी आपल्या यंञणेल निर्देश देण्याची आपणास नम्र विनंती करीत आहोत. आपल्याकडून या प्राथमिक सोई सुविधांच्या बाबतीत सकारात्मक कार्यवाही होईल ही अपेक्षा आहे. येत्या ४ दिवसात आमच्या मान्य होण्याच्या दृष्टीकोनातून आपल्या स्तरावरुन कार्यवाही न झाल्यास आपल्या कार्यालयाच्या समोर उपोषण करणे, मोर्चा काढणे, जिल्हधिकारी कार्यालयाकडे तक्रार करणे, मुख्यमंञी पोर्टल वर तक्रार करणे,लोकशाही दिनात तक्रार करणे या सर्व बाबी आमच्याकडून केल्या जातील असे निवेदना मध्ये म्हटले आहे.

मुख्याधिकाऱ्यांनी दिले आश्वासन
नवापूर शहरा पासुन २ कि.मी अंतरावर लाखानी पार्क वसले असुन याठिकाणी एक विहीर आहे त्या विहीरीतुन लाखानी पार्कला पाणीपुरवठा होते. पण तीन चार दिवसापासुन उन्हाची तिव्रता वाढल्यामुळे विहीर कोरडी पडल्यामुळे या भागात पाणीपुरवठा बंद झाला आहे.यावेळी न.पा मुख्यधिकारी राजेंद्र शिंदे म्हणाले की नवापूर नगरपालिकेचे पाण्याचे टँकरव्दार लाखानी पार्क भागातील त्या विहीरीत पाणी सोडण्यात येईल. या भागात नविन टॉकी बांधण्याचे काम प्रगतीपथावर आहे ती लवकर सुरु करणार आहोत. तसेच घंटागाडी रोज पाठविण्याचे प्रयत्न करु कोणीही कचरा हा उघडयावर टाकु नये दोन दिवसात सर्व प्रश्न आम्ही मार्गी लावण्याचे प्रयत्न करु असे सांगितले.

 

पहा । लाखाणी पार्क परिसरात रहिवाश्यांनी मुख्याधिकाऱ्यांना विचारला जाब

Add Comment

Protected Content