भुसावळ, प्रतिनिधी । आधुनिक काळात विविध प्रकारचे महोत्सव साजरे करण्यात येत असतात. यात बी-बियाणे, बचत गट व इतर महोत्सवांचा समावेश आहे. याच प्रमाणे शासनाने मद्य महोत्सव प्रारंभ करावा. या महोत्सवातून जगातील सर्व मद्यांची माहिती जनतेला एकाच ठिकाणी उपलब्ध होईल व त्यातून महसूल वाढीस हातभार लागेल असे मत डॉ. नितु पाटील यांनी आपल्या ‘पटत का बघा ?’ या सदरातून मांडले आहे. वाचा त्यांच्याच शब्दात
बी-बियाणे माहिती हवी…….बी-बियाणे महोत्सव
बचत गटाला प्रोत्साहन हवे …..बचतगट महोत्सव
दिवाळी,दशहरा …….. सेल धमका महोत्सव
विविध भजी खायची आहे….भजी महोत्सव
आरोग्याची काळजी …….आरोग्य शिबीर
स्थावर मालमत्ता माहिती……. प्रोपटी महोत्सव
कार माहिती ……कार महोत्सव
सर्व बाबींची माहिती एकाच ठीकाणी मिळावी म्हणून महोत्सव हि संकल्पना रुजू झाली,आणि महाराष्ट्रात तर फारच आहे,तेव्ह्या
जगातील सर्व मद्यांची महती आणि माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी म्हणून,” मद्य महोत्सव ”
फायदे:-
१. जनतेला सर्व मद्यांची माहिती,किंमत कळेल. जमल्यास चव घेण्याची संधी यामुळे मिळेल.
२. मद्य तयार करण्याची प्रक्रिया समजेल,त्यामुळे त्यांचे ज्ञान वाढेल.शिवाय परदेशातील मद्याचे प्रकार समजातील.
३. असे महोत्सव झाल्यामुळे शासनाला भरपूर महसूल मिळेल.शिवाय परदेशी गुंतवणूक वाढेल,त्यामुळे परकीय चलन मिळेल.आंतरराज्य तसेच आंतरराष्ट्रीय संबंध सुधारतील.
४. भारतीय मद्यालापण जागतिक ओळख मिळेल.
विकास कामासाठी हवा असणारा महसूल मोठ्या प्रमाणात मिळेल.
डॉ.नितु पाटील,
०८०५५५९५९९९