महसूल महत्वाचे की युवकांचे आरोग्य : डॉ. नितु पाटील (‘पटत का बघा ?’ भाग २)

भुसावळ, प्रतिनिधी । मद्य सेवनाचे दुष्परिणाम स्पष्ट करतांना डॉ. नितु पाटील यांनी ‘पटत का बघा ?’ या सदरातून सरकारला वयाची कोणतीही अट न ठेवता सर्रास मद्य पिण्याची परवानगी द्यावी….कारण तेवढा जास्त महसूल जमा होणार…तेवढे जास्त पारदर्शी विकास कामे होणार….! असा उपरोधिक सल्ला दिला आहे. आजच्या सदरात त्यांनी हजारो कोटींचा महसूल महत्वाचाकी युवकांचे आरोग्य असा प्रश्न उपस्थित केला आहे.

शाळेत नाव घालयाचे आहे …….. वय ५ वर्षे ( आता सध्या लवकरच )
मतदानाचा राष्ट्रीय हक्क …… वय वर्षे १८
मुलाचा लग्न करण्याचे ……….. वय २१ वर्षे
मुलीचे लग्न करण्याचे ……….१८ वर्षे
जेष्ठ नागरिक वर्षे ……… ६० वर्षे (केंद्र), ६५ वर्षे (राज्य)
शिक्षणासाठी,प्रशासकीय सेवेसाठी,स्पर्धा परिक्षेसाठी,न्यायाधीक्ष आदी.होण्यासाठी वयाची अट आहे….कारण वयानुसार व्यक्तीच्या विचारधारेत,शाररीक हालचालीत,निर्णय क्षमतेत, आदी फरक पडतो.
पण गम्मत पहा…..,
आपल्यासाठी,आपल्या देशासाठी,जगात देशाचे नाव मोठे करणारे कोणते सरकार योग्य आहे हे एखाद्याला समजण्याची समज वयाच्या १८ व्या वर्षी कळते …. पण आपल्यासाठी आपल्या परीवारासाठी मद्य उपयोगी की निरुपयोगी हे कळायला मात्र,

२१ वर्षे (बिअर) आणि २५ वर्षे (मद्य दारू,वोडका,व्हिस्की ई,)
( राज्यानुसार वेगवेगळी आहे वयोमर्यादा )
कारण महाराष्ट्र शासनानुसार २१ ते २५ वय वर्षे मर्यादा मद्यसेवन करण्यासाठी तय करण्यात आली आहे.
म्हणजे मद्य सेवनाने होणारे फायदे-तोटे कळण्यासाठी वय २१-२५ वर्षे…पण योग्य सरकार निवडुन देण्यासाठी वय वर्षे १८ आहे की नाही गम्मत………..!
वयाची कोणतीही अट न ठेवता सर्रास मद्य पिण्याची परवानगी द्यावी….कारण तेवढा जास्त महसूल जमा होणार…तेवढे जास्त पारदर्शी विकास कामे होणार….!

शेवटी हजारो कोटी महसूल महत्वाचा युवकांच्या आरोग्याचे काय आपल्याला?
यापेक्षा स्वतःला पुरोगामी महाराष्ट्र म्हणवून घेणाऱ्या महाराष्ट्र सरकारला आणखी काय हवे ?

डॉ. नितु पाटील,
०८०५५५९५९९९

Protected Content