शाळेच्या अपघातग्रस्त शिक्षकाला आर्थिक मदत; पोलिस अधिकाऱ्याकडून माणूसकीचे दर्शन

7dc04c11 1ae7 4e97 a169 6bc9d1cc182a

 

अमळनेर (ईश्वर महाजन) तालुक्यातील राजवड प्राथमिक शाळेचे शिक्षक रघुनाथ सरदार हे पाच दिवसापूर्वी लग्नकार्य आटोपून पत्नीसह पारोळा येथे परत येत असतांना त्यांचा मोरफळ फाटया जवळ अपघात झाला होता. त्यात श्री.सरदार यांच्या गुडघ्याखालील नस तुटत हाड कापले गेले होते. त्यावर ऑपरेशन करण्यासाठी सत्तर हजार रुपये खर्च येणार होता. परंतु आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे त्यांना ऑपरेशन शक्य होत नव्हते. अशा कठीण समई शाळेचा एक माजी विद्यार्थी मदतीला धावून आला. पीएसआय प्रशांत प्रभाकर पाटील यांनी मोठी आर्थिक मदत करत समाजासमोर आदर्श घालून दिलाय.

 

या संदर्भात अधिक असे की, शिक्षक रघुनाथ सरदार हे घरी परत येत असताना एका चारचाकीने मोरफळ फाटया जवळ त्यांना धडक दिली. या अपघातात पती-पत्नी रस्त्यावर फेकले गेले. त्यामुळे श्री सरदार यांच्या पाय व डोके तर त्यांच्या पत्नीच्या बरगळ्या व डोक्याला जबर मार लागला. चारचाकीवाल्यांनी त्यांच्यावर पारोळा येथे दवाखान्यात प्राथमिक उपचार करुन घरी पाठवुन दिले. पण दोघांना नंतर जास्तच त्रास व्हायला लागल्यामुळे ते तपासणीसाठी धुळे येथे हाडांचे डॉक्टर सैंदाणे यांच्याकडे गेले. तपासणीअंती शिक्षक सरदार यांच्या गुडघ्याखालील नस व हाड कापले गेले असल्याचे समजले. डॉक्टर सैंदाणे यांनी त्वरीत सर्जरी करुन घेण्याचा सल्ला दिला. त्याला सत्तर हजार रुपयापर्यंत खर्च सांगितला.

 

सरदार सर कुटुंबात हे एकटेच कमाविते व जबाबदाऱ्या जास्त असल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती नाजुक आहे. त्यामुळे आताच करावा लागणारा खर्च ऐकुन ते हवालदिल होत घरी परत आले. बरेच दिवस त्यांनी त्रास सहन करीत होते. ही गोष्ट सुनिल जाधव उप शिक्षक हिरापूर यांना समजल्यावर त्यांनी त्यांची भेट घेवुन परिस्थिती जाणुन घेतली. त्यांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन त्यांनी शेळावे केंद्राच्या शिक्षक व्हॉटसअप ग्रुपवर केले. याला गट शिक्षणाधिकारी चंद्रकांत चौधरी, शिक्षण विस्तार अधिकारी कविता सुर्वे, केंद्र प्रमुख जितेंद्र पवार यांच्यासह सर्व मुख्याध्यापक व शिक्षक बंधु बघिनींनी प्रतिसाद देत आर्थिक मदत गोळा केली.

 

श्री.सरदार यांना पुरेशी मदत मिळुन देण्यासाठी धाबे शाळेचे राज्य आदर्श शिक्षक मनवंतराव साळुंखे व पारोळा तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष गुणवंतराव पाटील यांनी स्वतः मदत देवुन प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच एक भाग म्हणुन राजवड गावाचे जास्त सदस्य असलेल्या चार व्हाटसअप ग्रुपवर मुख्याध्यापक साळुंखे यांनी या बाबत पोस्ट शेअर केली. त्यात थिरेंद्र पाटील राजवड यांच्या राज ग्रुपवरील सदस्य देवगावचे सुपुत्र प्रशांत प्रभाकर पाटील (पीएसआय, माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस स्थानक, मुंबई) यांनी त्वरीत प्रतिसाद देवुन काल रात्री अकरा वाजता सरदार सरांचा बॅक खाते नंबर मागवुन इंटरनेटच्या माध्यमातुन आपली आर्थिक मदत पाठविली. त्यांनी मदत व नाव जाहीर न करण्याची विनंती देखील केली होती. परंतु इतरांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळण्यासाठी नाव तरी जाहीर करु दया, अशी विनंती केल्यावर त्यांनी होकार दिला. प्रशांत पाटील हे देवगांवचे रहिवासी असुन गजानन हायस्कुलचे मुख्याध्यापक गणेश जाधव यांचे पुतणे आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण राजवड जि प शाळेत झाले असुन २०१२ मध्ये एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांची पोलिस उप निरीक्षकपदी निवड झाली आहे.

Add Comment

Protected Content