अमळनेर नगरपरिषदेत शिरीषदादा चौधरी मित्र परिवाराचे आंदोलन

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अमळनेर नगरपरिषदेच्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात आज शिरीषदादा चौधरी मित्र परिवारातर्फे जोरदार आंदोलन करण्यात आले.

अमळनेर नगरपरीषदे मार्फत लोकवर्गणी एकाच मालमत्ता धारकांकडून वेग वेगळ्या मार्गे वसुली केली जात आहे. तसेच  ३१ डिसेंबर २०२३ नंतर पाणीपट्टीला प्रति महा २ टक्के व्याज व त्या व्याजावर चक्रवाढ व्याज लावण्याच्या सत्ताधार्‍यांच्या तुघलकी धोरणाविरोधात व सर्वसामान्य जनतेची होणारी लूट थांबवण्यासाठी आज माजी आमदार शिरीषदादा चौधरी मित्र परिवार आघाडी तर्फे अमळनेर नागरपरिषदचे मुख्याधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले.

अमळनेर नगरपरीषदे मार्फत लोकवर्गणी एकाच मालमत्ता धारकांकडून वेगवेगळ्या मार्गे वसुली केली जात आहे. ३१ डिसेंबर २०२३ नंतर पाणीपट्टी ला २ टक्के व्याज व त्या व्याजावर चक्रवाढ व्याज लावण्याचे जे निर्णय झाले आहेत. ते निर्णय रद्द करण्यासाठी ता. ०९ सप्टेंबर रोजी माजी आमदार शिरीषदादा चौधरी मित्र परिवार आघाडी तर्फे अमळनेर नागरपरिषदचे मुख्याधिकारी  यांना निवेदन देण्यात आले होते. आता ३१ डिसेंबर २ दिवसांवर आला आहे तरी या निर्णयाविरोधात आत्ता पर्यंत मुख्यधिकार्‍यानी कुठल्याहि प्रकारची कार्यवाही केली नाही.

या अनुषंगाने, अमळनेर नगरपरिषदेने घेतलेले सर्वसामन्य जनतेची लूट करणारे तुघलकी निर्णय त्वरित मागे घेण्यासाठी आज माजी आमदार शिरीषदादा चौधरी मित्र परिवार आघाडी तर्फे अमळनेर नागरपरिषदचे मुख्याधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले.

दरम्यान शिरीष दादा मित्र परिवाराने आज केलेल्या या अनोख्या आंदोलनाने नगरपालिका मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी तात्काळ ३१ मार्च २०२४ पर्यंत स्थगिती देण्यासाठी नगर परिषद संचालनायाला तात्काळ प्रस्ताव पाठवण्यात येईल व त्याची अंमलबजावनी करण्यात येईल या आशयाचे लेखी यावेळी शिरीष दादा मित्र परिवार यांना देण्यात आले.

Protected Content