मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यावर गुन्हा दाखल करा; समाज बांधवाचे निवेदन

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सत्कार सोहळ्यानंतर पोटशुळ उठलेल्या  विजय पाटील नामक बोदवड तालुक्यातील एका पक्षाच्या भाडोत्री समाजकंटकाने सत्कार सोहळ्याविषयी आक्षेपार्ह व शिवराळ भाषेत तसेच मराठा समाजातील दोन गटात तेढ निर्माण होईल, अशा संतापजनक पोस्ट टाकली होती. यामुळे समाजाकडून संताप व्यक्त केला जात आहे. आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीचे निवेदन मुक्ताईनगर मराठा समाजाच्या वतीने पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांना देण्यात आले.

याप्रसंगी  निवेदन देतेवेळी, मराठा समाज तालुका अध्यक्ष अनंतराव देशमुख, दिलीप श्रीराम पाटील, राजेश पाटील ढोले, वाय डी पाटील, चंद्रकांत सोनू मराठे, गणेश विश्वनाथ पाटील, चेतन रघुनाथ पाटील, रविंद्र चव्हाण, प्रफुल्ल पाटील,कृष्णा पाटील, गजानन पाटील, नंदकिशोर बंगाळे, योगेश्वर तिजारे, सौरव पाटील, किशोर पाटील, कृष्णा बंगाळे, गोपाळ चौबे, भूषण पाटील, संतोष पाटील, उमेश पाटील, संदीप जंजाळ, प्रदीप कोल्हे, ज्ञानेश्वर पाटील, बाळू पाटील, गणेश श्रीकृष्ण पाटील, पांडूरंग पाटील, अमोल पाटील, विशाल डहाके, शिवराज पाटील, संतोष मराठे , जितेंद्र मुऱ्हे आदींसह असंख्य मराठा समाज बांधव उपस्थित होते.

 

दरम्यान, याप्रकरणी संतप्त जमावाला शांत करण्यासाठी सदरील समाज कंटकावर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्याने , व यानंतर मराठा समाज तालुका अध्यक्ष अनंतराव देशमुख यांच्या फिर्यादीनंतर विजय पाटील नामक समाज कंटक याचेवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Protected Content