मुख्यमंत्री पदासाठी उध्दव ठाकरेंच्या नावावर सर्वसंमती- पवार

मुंबई प्रतिनिधी । महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदासाठी उध्दव ठाकरे यांच्या नावावर सर्वसंमती झाल्याची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिली.

आज सायंकाळी महाविकास आघाडीची प्रदीर्घ बैठक झाली. ही बैठक सुरू असतांना शरद पवार आधी बाहेर पडले. याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलतांना ते म्हणाले की, अजून बैठक सुरू असून मुख्यमंत्र्यांच्या नावासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नावावर सर्वसंमती झाली आहे.

Protected Content