ममुराबाद कृषि विज्ञान केंद्रात फळप्रक्रिया प्रशिक्षण उत्साहात

जळगाव (प्रतिनिधी) राज्याचे कृषि विस्तार कार्यक्रमांना विस्तार विषयक सुधारणांकरीता सहाय्य्क (आत्मा) योजनेतंर्गत फळप्रक्रिया प्रशिक्षण आज ममुराबाद येथील कृषी विज्ञान केंद्रात आज मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

 

 

प्रशिक्षणाचे प्रास्ताविक संभाजी ठाकुर, जिल्हा अधिक्षक कषी अधिकारी, तथा प्रकल्प संचालक आत्मा, जळगाव यांनी केले. सदर प्रशिक्षण कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी उपस्थित राहून शेतक-यांना मार्गदर्शन केले. प्रशिक्षणा दरम्यान प्रादेशिक फळप्रक्रिया प्रशिक्षण केंद्र, औरंगाबाद येथील डॉ. राजेंद्र यादव व श्रीमती स्नेहलता साळुंके यांनी आवळा, बोर यांचेपासुन सरबत, पपई पासुन जॅम, टोमॅटो कॅचप, कांदा चटणी, मिरची लोणचे, पेरु जेली इ. तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखविले. सदर प्रशिक्षणासाठी जिल्हयातील एकूण 104 महिला व पुरुष शेतकरी उपस्थित होते. सदर प्रशिक्षणाचे यशस्वितेसाठी प्रकल्प संचालक, आत्मा, जळगाव कार्यालयातील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Protected Content