जळगाव, प्रतिनिधी । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीब १०० कुटुंबाना आसेंनिक अल्बम ३०,किराणा साहित्य, सॅनिटायजर व मास्कचे वाटप रामेश्वर कॉलनी व मेहरूण येथे करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकडाऊनच्या काळात रोजगार नसल्याने दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली आहे. हातचा रोजगार गेलाच आहे आणि त्यात परिवार चालवणे खुपच कठीण होवुन वसले आहे . याच परिस्थितीला आपला काहीतरी हातभार लागावा या हेतुने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे याच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन गोरगरीब १०० कुटुंबाना किराणा साहित्य,सॅनिटायजर,आर्सेनिक अल्बम ३० रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी या गोळयांचे वाटप रामेश्वर कॉलनी व मेहरून येथे करण्यात आले . या कार्यक्रमाचे आयोजन विभाग अध्यक्ष संदिप माडोंळे यांनी केले व तसेच इतर पदाधिकारी महानगर सचिव अविनाश पाटील,रस्ते आस्थापना जिल्हाअध्यक्ष राजेंद्र निकम ,सामाजिक कार्यकर्त्या सौ. अनुताई कोळी, एस. एम. गृपचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते अनिल सोनवणे, महेश माळी, हर्षल वाणी, गोविंदा जाधव, आर .डी. राव आदींच्या सहकार्याने हे साहित्य वाटप करण्यात आले.