मनवेल येथे महापुरुषाची विटंबना करून आई व मुलास बेदम मारहाण ; पोलीसात गुन्हा दाखल

 

यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील मनवेल येथे एका दारुड्याने महापुरुषाच्या नांवाच्या प्रवेशव्दारावर मोटरसायकलने धडक देवुन थुंकल्यावरून झालेल्या वादात एका टोळक्यांकडुन आई व मुलास बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली असुन याबाबत पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . आज दहा संयशीत आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे.

या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी की, मनवेल तालुका यावल येथे दिनांक २ जुन रोजी ७. ३o वाजेच्या सुमारास गावातील मधुकर धोंडू इंधाटे यांच्या किराणाच्या टपरीवर प्रथमेश सुनिल सोनवणे आणि स्वप्नील मंगल इंधाटे हे उभे असता गावातील डांग्या रमण कोळी हा त्याच्या ताब्यातील मोटरसायकल घेवुन किराणा साहीत्य खरेदी आला. तो दारूच्या नशेत असतांना त्यांने त्याच्या ताब्यातील मोटरसायकलने महापुरुषाच्या नावाच्या प्रवेशव्दारावर गाडीने धडक दिली. त्यावेळेस हजर असलेल्या स्वप्नील इंधाटे आणि प्रथमेश सोनवणे यांनी त्यास दारूच्या नशेत अशा प्रकारे प्रवेशव्दारावर अशा प्रकारे धडक देवु नकोस असे सांगीतल्यावर डांग्या कोळी यांने त्यांच्याकडुन पाहुन जातीवाचक अपशब्द बोलुन पुन्हा त्या प्रवेशव्दाराच्या भिंतीवर थुकला व तुझ्याकडुन होईत ते करून घे अशी धमकी दिली. दरम्यान ५ जुन रोजी पुनश्च सायंकाळी ४ .३० वाजेच्या सुमारास स्वप्नील व प्रथमेश हे गावा बाहेरील भुवनेश्वरी विद्यामंदीर शाळा समोरील नदीपात्रात यावलहुन आल्यानंतर मित्राची मोटरसायकल धुण्याचे काम करीत असतांना गावातील राहणारा संयशीत आरोपी नितेश उर्फ डांग्या रमण कोळी याने आम्हास बघीतले व गावातुन आपल्या सोबत संजय अशोक कोळी , विजय भगवान कोळी , कैलास डिंगवर तायडे, दिनेश रमण कोळी, दितेश बंडू तायडे , निखील बंडु तायडे , आकाश अशोक कोळी , भगवान दौलत कोळी, अशोक भास्कार कोळी , रमेश भास्कर कोळी, अशोक उर्फ भैय्या गुलाब कोळी यांनी संगनमताने मिळुन मला व माझ्या सोबत असलेले सचिन बाबुराव सोनवणे व आविनाश सुरेश भालेराव यांना जातीवाचक शिवीगाळ करून लाथाबुक्यानी बेदम मारहाण केली व तिथुन निघुन गेले. त्यानंतर पुन्हारात्री ८ .३० वाजेच्या सुमारास याच लोकांनी मला व माझ्या आईला लोखंडी रॉड व लाकडी दांडाने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली असुन या संदर्भात प्रथमेश सुनिल सोनवणे यांनी पोलीसात फिर्याद दाखल केल्याने वरील सर्व आरोपीविरूद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन यातील दहा संयशीत आरोपींना पोलीसांनी अटक केली असुन विभागीय पोलीस अधिकारी नरेन्द्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक अरूण धनवडे हे करीत आहे .

Protected Content