मध्य प्रदेशात कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना दरमहा ५ हजार मदत , शिक्षणही मोफत

 

भोपाळ : वृत्तसंस्था । कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना   प्रति महिना ५ हजार रुपये पेन्शन देण्याची घोषणा मध्य प्रदेश सरकारने केली आहे.  या मुलांची मोफत शिक्षणाची जबाबदारीही सरकार उचलणार आहे

 

देशात कोरोनाचं संकट गडद झालं आहे.  मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस नकोसे विक्रम प्रस्थापित करत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. कोरोनामुळे अनेक पालकांचा जीव जात असल्याने लहान मुलांचा प्रश्न ऐरणीवर   आहे. .

 

‘कोरोनामुळे आई वडील गमवले असून घरात कमवतं कोणच नसेल अशा कुटुंबांना प्रति महिना ५ हजार रुपये व मुलांना मोफत शिक्षणही दिलं जाणार आहे.  ज्या कुटुंबातील कमवत्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अशा कुटुंबांना मोफत रेशन दिलं जाईल.  या कुटुंबांना सरकारच्या हमीवर कर्जही दिलं जाईल’, असं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं

 

 

मध्य प्रदेशमध्ये दुसऱ्या लाटेत आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा वाजले आहेत. दर दिवशी   ८ हजार रुग्णांची नोंद होत आहे. गेल्या २४ तासात राज्यात ८४ जणांचा मृत्यू झाला आहे. असं असलं तरी गेल्या महिन्याच्या तुलनेत १४ टक्के रुग्ण कमी झाल्याचं आकडेवारीतून दिसत आहे. मध्य प्रदेशात करोना रुग्णांची एकूण संख्या ७ लाखांच्या पार गेली आहे.   आतापर्यंत एकूण ६ हजार ६७९ जणांचा मृत्यू झाला आहे.

Protected Content