मथुरेतील मशिदीत हनुमान चालीसा पठण

 

मथुरा: वृत्तसंस्था । उत्तर प्रदेशातील मथुरा येथील गोवर्धन परिसरातील ईदगाहमध्ये चार युवकांनी हनुमान चालीसा पठण केले. मंगळवारी झालेल्या या हनुमान चालीसा पठणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत चार युवकांना ताब्यात घेतले

, ईदगादमध्ये हनुमान चालीसा पठण करणाऱ्या युवकांची नावे सौरभ लंबरदार, राघव मित्तल, कान्हा आणि कृष्णा ठाकूर अशी आहेत. हे सर्व युवक गोवर्धन परिसरातील रहिवाशी आहेत. मात्र,आतापर्यंत कोणी तक्रार नोंदवली नसून सोशल मीडियावर हनुमान चालीसा पठणाची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे.

 

या पूर्वी नंदगाव येथील नंदबाबा मंदिर परिसरात दोन मुस्लिम युवकांनी नमाज पठण केले होते. ही पोस्ट देखील सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले होते. फैजल खान आणि चांद मोहम्मद पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या युवकांची नावे होती.

मंदिरातील सेवेकरी गोस्वामी यांनी पोलिसात तक्कार दाखल केली. २९ ऑक्टोबरला दुपारी सुमारे साडे १२ च्या सुमाराला फैजल खान आणि चांद मोहम्मद हे दिल्लीतील खुदाई खिदमतगार संस्थेचे सदस्य असलेले युवक या संस्थेचे आलोक रतन आणि नीलेश गुप्ता यांच्यासोबत आले होते. या मुस्लिम युवकांनी परवानगी न घेता आणि कोणत्याही प्रकारची माहिती न देता मंदिराच्या प्रांगणात नमाज अदा केली आणि नमाज पढत असतानाचे आपले फोटो आपल्या मित्रांकरवी सोशल मीडियावर व्हायरल केले, असा एफआयआरमध्ये आरोप करण्यात आला आहे.

 

त्यांच्या या कृत्यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत आणि श्रद्धेला धक्का बसला आहे, असे म्हटले होते. या बरोबरच एफआयआरमध्ये त्यांचा कुण्या परदेशी मुस्लिम संघटनेशी संबंध असल्याचे एफआयआरमध्ये म्हटले होते.

Protected Content