जळगाव राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल जिल्हाध्यक्षपदी डॉ.सागर गरुड

जामनेर प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षवाढीसाठी धडपडणारे डॉ.सागर गरुड यांचे डॉक्टर सेल जळगाव जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून त्यांना मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात नियुक्तीपत्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपमुख्यमंत्रीअजित पवार यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी राजेंद्र बनसोडे धनंजय मुंडे सुप्रियाताई सुळे रोहित पवार आमदार निलेश लंके रवींद्र भैय्या पाटील सुनसगाव उपसरपंच दत्ता पाटील राष्ट्रवादी जामनेर शहर अध्यक्ष पप्पू पाटील शंतनु गरुड पंकज पाटील देवेंद्र पाटील विकी पाटील संभाजी पाटील गजानन पाटील भवन चौधरी चेतन चौधरी संदीप चौधरी संदीप हिवाळे आदी यावेळी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा माननीय शरद चंद्रजी पवार यांच्या आदेशाने तरुणांचे आधारस्तंभ व गोरगरीब जनतेसाठी नवरात्र झटणारे डॉक्टर सागर गरुड यांची डॉक्टर सेल जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाली असून ते नेहमी पक्षासाठी धडपड करीत असतात त्यामुळे पक्षाने त्यांची दखल घेतली असून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे याबाबत डॉक्टर सागर गरुड यांनी आपल्याला पक्षाने दिलेली जिल्ह्याची जबाबदारी एकनिष्ठपणे पार पडणार असून गोरगरीब जनता व सर्वसामान्यांसाठी काम करणार आहे त्याचबरोबर पक्षवाढीसाठी अहोरात्र प्रयत्न करणार असल्याची माहिती प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी दिली आहे

 

Protected Content