भोगावती नदी सुशोभीकरण निविदा त्वरित काढा अन्यथा आंदोलन : भाजपचा इशारा(व्हिडिओ)

वरणगाव, दत्तात्रय गुरव | वरणगाव शहरातून वाहणाऱ्या भोगावती नदीच्या सुशोभीकरणासाठी तत्कालीन फडणवीस सरकारने साडे पाच कोटींचे अनुदान दिले होते. याप्रस्तावास ३ मार्च २०२१ रोजी मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. परंतु, ८ महिन्याचा कालावधीत उलटून देखील वरणगाव नगरपरिषदतर्फे प्रत्यक्ष निविदा प्रक्रिया राबविण्यात आली नाही. ही निविदा प्रक्रिया ८ दिवसात राबविण्यात आली नाही तर जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भाजपने मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

 

भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरातून असलेली भोगावती नदी हा संस्कृतीचा वारसा आहे. आम्ही सत्तेवर असतांना २०१८-१९ ला वरणगावकरांच्या मेहनतीने वरणगाव नगरपरिषदेचा स्वच्छ सर्वेक्षण अभियानात जळगाव जिल्ह्यात एक नंबर आले होते.त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तत्कालीन पालकमंत्री आ. गिरीश महाजन सरकारने प्रोहस्सान पर साडे पाच कोटीचे अनुदान दिले होते. त्या अनुदानातून भोगावती नदीचे शुशोभीकरण करून घाट बांधणे, अवती भवती गार्डन करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. त्यासाठी नगरविकास विभागाची मान्यता लागत असल्याने टेंडर निघाले नाही, मात्र, जानेवारी २०२१ ला प्रस्ताव मान्यतेसाठी मंत्रालयात पाठवला होता. त्या अनुषंगाने ३ मार्च २०२१ ला मान्यता मिळाली. मात्र ८ महिने झाले तरी कामसुरु होत नाही.
यासाठी आंदोलने उभारली, मागण्या केल्या तरी नगरपरिषद प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नव्हता. माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी माजी मंत्री आ. संजय सावकारे यांना साकडे घालून भोगावती नदीचा मार्ग मोकाळा करा असे साकडे घातले. त्यानुसार ६ ऑक्टोबरला मंत्रालयात आ. संजय सावकारे यांनी मीटिंग घेतली, तेव्हा ही बाब उघड झाली की, वरणगावच्या भोगावती नदीच्या विकास कामांच्या मान्यता तर ३ मार्च रोजी झाली आहे. मग वरणगाव नगरपरिषदेला यायला ८ महिने कसे लागले का ? कोणी मुद्दाम मान्यता गहाळ केली. याचा सुद्धा शोध घेणे गरजेचे आहे. मुद्दाम भोगावती नदीचे काम होऊ नये यासाठी ८ महिने झाले तरी कार्यवाही झाली नाही. त्यात ६ ऑक्टोबरला जीआर आला असतांना नगरपरिषद प्रशासन आज दि २२ ऑक्टोबरपर्यंत १७ दिवस झाले तरी सुद्धा निविदा काढण्यास उदासीन आहे. मुख्यधिकारी समीर शेख यांची भेट घेउन ८ दिवसाच्या आत भोगावती नदीच्या कामाची निविदा काढा अन्यथा जनआंदोलन उभारले जाईल असा इशारा आज निवेदन देऊन माजी नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख आखलाक, नगरसेविका माला मेढे, मेहनाज पिंजारी, भाजपा अध्यक्ष सुनील माळी, भाजयुमो अध्यक्ष संदीप भोई, महिला अध्यक्षा प्रणिता पाटील, चौधरी मयुर गावंडे, ज्ञानेश्वर घाटोळे, मिलिंद भैसे, किशोर चौधरी, पप्पू ठाकरे, गणेश चौधरी, शुभम आमोदकर, शंकर पवार, आकाश निमकर, रॉक्स कश्यप, राहुल जंजाळे, कमलाकर मराठे यांनी दिला आहे.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2981120138767998

 

Protected Content