भुसावळ प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमिवर येथील न्यायालयात स्वच्छतेच्या आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असून कोर्टात फक्त अत्यावश्यक कामच होणार असल्याची माहिती आज बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. तुषार पाटील यांनी दिली.
कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमिवर सरकारने न्यायालयांमध्ये दररोज फक्त ११ ते २ या कालावधीतच काम होणार असल्याचे जाहीर केले आहे. या अनुषंगाने येथील न्यायालयातही याच वेळेत काम होणार असल्याची माहिती आज बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. तुषार पाटील यांनी दिली. जनतेने या बदलाची नोंद घेऊन न्याय प्रणालीस सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, कोरोनाचा संभाव्य संसर्ग टाळण्यासाठी येथील न्यायालयात उपाययोजना करण्यात येत असून कोर्टात जाणार्या प्रत्येक व्यक्तीचे हात स्वच्छ केले जात आहेत. न्यायाधिश, न्यायालयीन कर्मचारी आणि बार असोसिएशनच्या सदस्यांनी या मोहिमेसाठी सहकार्य केले आहे.
पहा : अॅड. तुषार पाटील यांनी दिलेल्या माहितीचा व्हिडीओ.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2023075994505330