भुसावळ प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बिल्डिंग मटेरियल व्यापारी असोसिएशनच्या वतीने भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याला २० बॅरीगेट्स सुपूर्द केले.
कोरोनोचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच शहरातील मुख्य मार्गावर वाहतुकीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने रस्त्यावर लाकडे गाडून पत्रे आडवी लावण्यात आले आहे. यात पोलीसांचा वेळ जात असुन मनुष्यबळ जास्तीचे लागत आहे. याचे भान ठेवून भुसावळ शहरातील बिल्डिंग व्यापारी असोसिएशनने आपण हि समाजाचे काही देणे लागतो या उदात्त हेतूने ट्रॅफिक पोलीस कर्मचाऱ्यांकरिता २० बॅरीगेट्स तयार करून बाजारपेठ पोलिस ठाण्याला सुपूर्द केले आहे.
पोलीस विभागाने मानले आभार
उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत व पोलीस कर्मचाऱ्यांनी व्यापारी मटेरियल असोसिएशनचे आभार मानलेत. भुसावल बिल्डिंग मटेरियल व्यापारी एसोसिएशनचे कमलजीत सिंह गुजराल (प्रिंसी सेठ), विकास पाचपांडे, पंडित भीरुड, संजय काळे, मनोज आगहिचा, सतीश उगले, पवन चव्हाण, दीपक पाटिल आदी उपस्थित होते.