भुसावळ प्रतिनिधी । सीएए आणि एनआरसीला विरोध म्हणून पुकारलेल्या बंदला शहरात हिंसक प्रकरण लागल्याचे दिसून आले असून एका हॉटेलवर दगडफेक करण्यात आली आहे.
याबाबत वृत्त असे की, नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध म्हणून आज भारत बंद पाळण्यात येत आहे. दरम्यान, कालच शहरातील व्यापार्यांनी या संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेऊन पोलीस संरक्षणाची मागणी केली होती. यानंतर आज सकाळपासून बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद लाभल्याचे दिसून येत आहे. थोडी दुकाने बंद असली तरी काही दुकाने उघडी आहेत. दरम्यान, शहरातील बसस्थानक परिसरात असलेल्या हॉटेल आर्यनिवासवर सकाळी काही आंदोलकांनी दगडफेक केल्याने तणावाचे वातावरण पसरले. यात हॉटेलचे काच फुटले आहेत. संबंधीत व्यक्ती सीसीटिव्हीत दिसत असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.