समता नगरातील २१ वर्षीय तरूणीचा विनयभंग

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील समता नगरातील एका भागात राहणारी २० वर्षीय महाविद्यालयीन तरूणीचा विनयभंग केल्याचा प्रकार मंगळवारी १६ जानेवारी रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी रात्री १० वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, भुसावळ शहरामधील समता नगरातील एका भागात २० वर्षीय महाविद्यालयीन तरूणी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मंगळवारी १६ जानेवारी रोजी साडेसहा वाजेच्या सुमारास त्याच परिसरात राहणारा शशीकांत लक्ष्मण लोखंडे (वय ५१) याने तरूणीच्या कमरेला पकडून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर पिडीत तरूणीने हा प्रकार नातेवाईकांना सांगितला. त्यानंतर रात्री १० वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी शशीकांत लक्ष्मण लोखंडे याच्या विरोधात भुसावळ शहर पोलीस ठाण्यात विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुपडा पाटील हे करीत आहे.

Protected Content