भुसावळात जवानाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील आरपीडी पॉइंटवर भगत मंगेश जीनवार (वय ३२ रा. चिखली ता. बुलढाणा) या जवानाने ड्युटीवर असतांना स्वतःच्या बंदुकीने गोळी झाडून आत्महत्या केल्याची दुर्घटना घडली आहे.

जीनवार यांनी स्वत:वर गोळी झाडून आपली जीवनयात्रा संपविली. त्यांचा मृतदेह जिल्हा रूग्णालयात आणण्यात आला असून त्यांचे शवविच्छेदन करण्यात येत आहे. या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात मुतदेह आणण्यात आलं आहे. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.

Protected Content