भुसावळ प्रतिनिधी । शहरातील शिरपूर कन्हाळा रोडवरून एकाची २० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, सुनिल इच्छाराम पाटील (वय-६२) रा. स्टार पॅलेस कॉलनी, जामनेर रोड भुसावळ हे कुटुंबियासह वास्तव्याला आहेत. ते सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. सुनिल पाटील हे १३ डिसेंबर रोजी रात्री वाजेच्या सुमारास दुचाकी (एमएच १९ डीए ४८२३) ने शहरातील शिरपूर कन्हाळा परिसरात कामानिमित्त गेले. त्यावेळी त्यांनी स्टार लॉन जवळ दुचाकी पार्किंग करून लावली होती. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी पार्किंगला लावलेली २० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याचा प्रकार रात्री १० वाजता उघडकीला आला. याबात त्यानी तीन दिवस दुचाकीची शोधाशोध केली. अखेर गुरूवारी १७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक रमन सुरळकर करीत आहे.