तिघा चोरट्यांना एलसीबीने केली अटक‎

भडगाव प्रतिनिधी– शहरातील यशवंतनगर भागात झालेल्या चोरी प्रकरणी एलसीबीच्या पथकाने तिघांना अटक केली आहे.

भडगावातील यशवंतनगर भागात‎ अर्जून भिल्ल यांच्याकडे ९‎ डिसेंबरला घरफोडी झाली होती. त्यात‎ सुमारे ८ हजार ५०० मुद्देमाल चोरांनी‎ लांबवला होता. या चोरीच्या घटनेतील तीन ‎ ‎ संशयितांनी एलसीबीच्या पथकाने ‎ सुनील‎ ‎ परशुराम पवार‎ (वय २२), अनिल विरभान‎ सूर्यवंशी (वय २७), विजय प्रकाश‎ घोडेस्वार (वय १९) यांना ‎ ताब्यात घेतले. त्यांच्याकडून‎ ७ मोबाइल आणि चार हजार रुपये‎ रोख हस्तगत केले आहे.‎ संशयितांना भडगाव पोलिसांच्या‎ ‎ ताब्यात देण्यात आले.‎

ही कारवाई सहाय्यक फौजदार‎ अशोक महाजन, हेड कॉन्स्टेबल‎ लक्ष्मण पाटील, पोलिस नाईक‎ ‎ ‎ रणजित जाधव,‎ ‎ नंदलाल पाटील,‎ ‎ किशोर राठोड,‎ ‎ भगवान पाटील,‎ ‎ ईश्वर पाटील,‎ ‎ उमेश गोसावी,‎ ‎ विनोद पाटील,‎ ‎ श्रीकृष्ण देशमुख,‎ ‎ चालक पवार‎ ‎ यांच्या पथकाने केली आहे.

Protected Content