भुसावळ संतोष शेलोडे । आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये भुसावळ तालुक्यात अजून २० नवीन कोरोना बाधीत आढळल्याने येथील बाधीतांची संख्या तब्बल ३०० इतकी झाली असून हा आकडा जिल्ह्यात सर्वाधीक असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
आज सायंकाळी जिल्हा माहिती कार्यालयाने दिलेल्या प्रेस नोट नुसार भुसावळ तालुक्यात २० नवीन कोरोना बाधीत रूग्ण आढळले आहे. यामुळे येथील बाधीतांचा आकडा हा ३०० इतका झाला आहे. काल जळगाव व भुसावळात समसमान म्हणजे २८० रूग्ण होते. आज जळगावात १७ तर भुसावळात २० रूग्ण आढळले. यामुळे भुसावळ आता जळगावच्याही पुढे गेले असून येथील रूग्ण संख्या ३०० इतकी झाली आहे. शहरात काही प्रमाणात अनलॉक करण्यात आले असल्याने नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडत असल्याने संसर्ग वाढल्याची शक्यता आता वर्तविण्यात येत आहे. यामुळे भुसावळकरांनी फिजीकल डिस्टन्सींगचे पालन करण्याची आवश्यकता अधोरेखीत झाली आहे.