भीषण अपघात : भरधाव डंपरने दुचाकीस्वाराला उडविले !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ममुराबाद ते विदगाव रस्त्यावरील फार्मसी महाविद्यालयाजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने दिलेल्या धडकेत धामणगाव येथील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवार २७ फेब्रुवारी रोजी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास घडला आहे. घटना घडल्यानंतर जळगाव तालुका पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा करत मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आला. उमाकांत गणेश सपकाळे वय २२ रा. धामणगाव ता. जळगाव असे मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील धामणगाव येथील रहिवाशी उमाकांत सपकाळे हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. मंगळवार २७ फेब्रुवारी रोजी उमकांत सपकाळे हा तरूण रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास धामणगाव येथून दुचाकी (एमएच १९, डीई ६३७७) ने धामणगावकडून जळगावकडे येत होता. त्यावेळी ममुराबाद ते विदगाव रस्त्यावरील फार्मसी महाविद्यालयाजवळून जात असतांना समोरून भरधाव वेगाने येणारा डंपर क्रमांक (एमएच १४, जीसी २४२३) ने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीसह दुचाकीस्वार रस्त्याच्याकडेला फेकले गेले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उमाकांत सपकाळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर भरधाव डंपर देखील उलटले. या अपघातानंतर डंपरचालका हा घटनास्थळाहून पसार झाला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलीसांनी घटनस्थळी धाव घेवून पंचनामा केला व मयताची ओळख पटविली. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

 

Protected Content