जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील टॉवर चौकात आलेल्या बसमधील महिला वाहकाला असतील शिवीगाळ करत हाताला गंभीर दुखापत केल्याची घटना मंगळवारी ११ मार्च रोजी सायंकाळी ५.१५ वाजता घडली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात रात्री ८ वाजता एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव आगार डेपोतील महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बस क्रमांक (एमएच १४ डीटी २१७५) मध्ये नरगीस खलील मण्यार (वय-३६,रा. एसटी कॉलनी जळगाव) या महिला बस वाहक म्हणून नोकरीला आहेत. नेहमीप्रमाणे मंगळवारी ११ मार्च रोजी सायंकाळी ५.१५ वाजता त्यांची बस जळगाव शहरातील टॉवर चौकात आली. त्यावेळी बसमध्ये सुशिलाबाई उखर्डू शिरसाट वय-७०, रा.नांद्रा ता. जळगाव या ही महिला देखील बसमध्ये चढली. त्यावेळी महिला वाघ यांनी त्यांना मागे जाण्याचे सांगितले. याचा राग आल्याने सुशीलाबाई शिरसाट यांनी महिला कंडक्टरला अश्लिल करत त्यांच्या हाताला दुखापत केले. दरम्यान ही घटना घडल्यानंतर बसमधील महिला वाहक यांनी जळगाव शहर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार सायंकाळी ७ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार संगीता खंडारे करीत आहे.