बोदवड : प्रतिनिधी । भीती न बाळगता जनतेने कोरोना लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन आज ऍड अर्जुन पाटील यांनी केले
बोदवड न्यायालयात लसीकरणाप्रसंगी एड अर्जुन पाटील बोलत होते .बोदवड तालुका वकील संघाच्या पाठपुराव्यानुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या आदेशानुसार काल दिवसभर बोदवड न्यायालयात वकील वृंद व न्यायालयीन कर्मचारी यांना covid-19 च्या पहिल्या व दुसऱ्या डोसच्या लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी covid-19 बाबत तसेच डेल्टा प्लस या नवीन प्रकाराबाबत घ्यावयाची काळजी याबाबत ग्रामीण रुग्णालयाचे डॉ कपिल पवार यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी बोदवड तालुका वकील संघाचे अध्यक्ष ऍड अर्जुन पाटील यांनी आवाहन केले की, तालुक्यातील जनतेने covid-19 आजाराबाबत तसेच लसीकरणाबाबत कोणतीही भीती न बाळगता लसीकरण करावे. लसीकरणाबाबत कोणतेही गैरसमज अफवा यांना बळी न पडता शासनाच्या लसीकरणाच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे. सामाजिक बांधिलकी जपून योग्य ती दक्षता व काळजी घेऊन तसेच अनावश्यक भीती काढून, लसीकरणास सर्व जनतेने सहकार्य करावे.
यावेळी बोदवड न्यायालयाचे न्या एस.डी . गरड , वकील संघाचे अध्यक्ष ऍड अर्जुन पाटील, ऍड विकास शर्मा, ऍड धनराज प्रजापति , ऍड . अमोल पाटील, ऍड मिनल अग्रवाल, ऍड तेजस्विनी काटकर, ऍड विजय मंगळकर यांच्यासह न्यायालयीन कर्मचारी वर्ग, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ कबीर खान , आरोग्यसेविका राखी यादव , अमोल पाटील, तुषार वाकचौरे, आशा माळी , दिपाली सोनवणे व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.