निसर्ग संवर्धन दिनानिमित्त तोरणाळा येथे वृक्ष लागवड

जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील तोरणाळा येथे निसर्ग संवर्धन शुद्धोधन नवनिर्माण युवा फाउंडेशन यांच्या वतीने मानव कल्याणाचा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाच्या प्रसंगी पूज्यनीय भन्ते महेंद्र बोधी यांच्या हस्ते महान अशा पवित्र पिंपळ बोधी वृक्षाचे वृक्षारोपण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली होती. त्यावेळी एकूण साठ वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. या ठिकाणी तोरणाळा गावातील सर्व समाज बांधव व माता भगिनींची उपस्थिती होते. मात्र वृक्षारोपण झाल्यानंतर वृक्ष संगोपनाची जबाबदारी सुद्धा माता भगिनींनी घेतली आहे. “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे”  झाडे आपली मित्र आहेत. झाडे नाही तर जीवनच नाही, सर्व सजीवांना जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. आणि तेच ऑक्सीजन देण्याचं मोठं काम झाडे करतात खरं तर झाडांचे महत्व कोरोनाच्या महामारीत ऑक्सिजनचा तुटवडा पडल्यानंतर आपल्या भारतीयांच्या लक्षात आले आहे. म्हणून एक झाड लावू आपण त्याला पाणी घालू अशी संकल्पना प्रत्येकाने करून त्या एका झाडाचे चांगल्या प्रकारे संगोपनाची सुद्धा जबाबदारी आपणच स्विकारली पाहिजे असेही माता भगिनींनी यावेळेस सांगितले आहे.

Protected Content