जळगाव प्रतिनिधी । शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सट्टा जुगार अड्ड्यावर छापा टाकून दोन जणांना अटक करण्यात आली असून १२३० रूपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. शनीपेठ पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक विठ्ठल ससे यांना भिलपुरा परिसरात दोन जण सट्टा जुगाराचा खेळ खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शोध पथकातील पोलीस हेडकॉस्टेबल दिनेशसिंग पाटील, पोलीस नाईक अभिजित सैंदाणे, पोलीस कॉन्स्टेबल किरण वानखेडे, राहूल पाटील यांच्या पथकाला कारवाईच्या सुचना केल्या. पथकाने सोमवारी सकाळी 10.15 नूर बॅन्डच्या बाजूला गल्लीत भिंतीच्या आडोश्याला सुरु असलेल्या सट्टा जुगाराच्या खेळावर छापा टाकला. तसेच शैलेश सुरेश सुरळकर (वय 38, रा. जोशीपेठ) व शरद भगवान चौधरी (वय 55 रा. मेस्कोमाता नगर) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीत 1250 रुपयांची रोडक तसेच घटनास्थळावर मिळून आलेले सट्ट्याचे साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राहूल पाटील यांच्या फिर्यादीवरुन शैलेश सुरळकर व शरद चौधरी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला . पुढील तपास दिनेशसिंग पाटील, अमोल विसपुते, अश्विन हडपे करीत आहेत.