जळगाव प्रतिनिधी । भाजपा युवा मोर्चा जळगाव जिल्हा महानगर सोशल मीडिया प्रमुखपदी भुषण जाधव यांची निवड करण्यात आली आहे.
यापूर्वी ते नमो ग्रुप फाऊंडेशनचे सोशल मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष होते. या पदावर असतांना कोरोनो संसर्गाच्या प्रतिबंधासाठी अल्सेनिक अल्बम ३० ह्या होमिपॅथी औषधीचे वाटप न्यू बी.जे.मार्केट व सुप्रीम कॉलनी येथे केले. या विनामूल्य सेवेचा लाभ १५३० लोकांनी घेतला. तसेच रेशन दुकानदाराची अरेरावी व नियमित पुरवठा न करणे अश्या रेशन दुकानदारांची मनमानी थांबविण्यासाठी शासन दरबारी आवाज उठवून गरीब जनतेला नियमित या महामारी मध्ये धान्य मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे नेहमीच नागरिकांच्या तक्रारीची दाखल घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते नेहमी धडपड करत असतात. त्यांच्या ह्या धाडसी वृत्तीचा व ओढ असलेल्या सामाजिक कार्याचा विचार करून भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद सपकाळे यांनी भुषण मनोहर जाधव यांची भाजपा युवा मोर्चा जळगाव जिल्हा महानगर सोशल मीडिया प्रमुखपदी निवड केली आहे.
या निवडीबद्दल मंत्री आ.गिरीश महाजन, जेष्ठ नेते एकनाथराव खडसे, विभागीय संघटन मंत्री अॅड.किशोर काळकर, आ.राजूमामा भोळे, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, जि.प.अध्यक्ष रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, खा.उन्मेष पाटील, खा.रक्षा खडसे, डॉ.राजेंद्र फडके, माजी आ.स्मिता वाघ, आ.चंदू पटेल, माजी आ.गुरुमुख जगवाणी, सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ.राधेशाम चौधरी, महेश जोशी, नितीन इंगळे, वि.क्षे.प्रमुख दीपक साखरे, महापौर भारती सोनवणे, माजी महापौर सिमा भोळे, उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे, स्थायी समिती सभापती अॅड.शुचिता हाडा, शोभा बारी, गटनेते भगत बालाणी, नगरसेवक जितेंद्र मराठे यांनी अभिनंदन केले.