भुसावळ,प्रतिनिधी | शहरातील भाजीपाला विक्रेत्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भुसावळातील चार भागात प्रशासनाने विभागणी करून भाजीपाला विक्री करण्याची परवानगी दिली होती. त्यांना आता पूर्ववत नेहमीच्या ठिकाणी बाजारात व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात आली आल्याने भाजीपाला विक्रेत्यांना दिलासा मिळाला आहे.
भाजीपाला विक्रेत्यांना भुसावळात चार भागात प्रशासनाने विभागणी करून विक्री करण्याची परवानगी दिली होती. आजपासून भुसावळात नेहमी बाजार भरत असलेल्या ठिकाणी विक्री करण्याची परवानगी प्रशासनाने दिली आहे. कोरोनामुळे तीन महिन्यापासून भाजीपाला विक्रीसाठी भटकंती करणाऱ्या विक्रेत्यांना प्रशासनाने दि १ मेपासून नेहमीच्या ठिकाणी बाजारात भाजीपाला विक्री करण्याची परवानगी दिल्याने विक्रेत्यांना दिलासा मिळाला आहे. विक्रेते शासनाच्या नियमांचे काटेखोरपणे पालन करणार असून आजूबाजूला सोशल डिस्टन्सिंगसाठी दोरी बांधण्यात आली आहे. सॅनिटायझरचा वापर करण्यात येत आहे. हातामध्ये हातमोजे घालण्यात आले आहे. मास्क तोंडाला लावून शासनाच्या नियमांचे पालन करण्यात आले आहे अशी माहिती जय गजानन ग्रुपचे नरेंद्र जोशी यांनी दिली.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/272206814189919/