जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जोपर्यंत पंतप्रधान मोदी महाराष्ट्राची माफी मागत नाही तोपर्यंत भाजपाच्या कुठल्याही लोकप्रतिनिधीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती महोत्सवामध्ये सहभागी करून घेऊ नये असे आवाहन एनएसयूआय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या सदस्यांना केले आहे.
आज शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला एनएसयूआय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी लाईव्ह ट्रेंड्स न्यूजशी बोलतांना सांगितले की, लोकसभेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला बदनाम केले व महाराष्ट्रामुळेच देशात कोरोना पसरला या पद्धतीचं बेताल वक्तव्य केले. त्यामुळेच आज जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीला विनंतीपूर्वक आवाहन केले की “उद्याच्या होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती कार्यक्रमामध्ये जोपर्यंत भाजपाचे नेते नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राची माफी मागत नाही तोपर्यंत भाजपाच्या कुठल्याही लोकप्रतिनिधीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती महोत्सवामध्ये सहभागी करून घेऊ नये तसेच भाजपाच्या आमदार खासदार नगरसेवक यांनी देखील स्वतःची नैतिकता जपून जर त्यांना देखील महाराष्ट्राबद्दल थोडे देखील प्रेम असेल तर त्यांनी देखील त्यांचे नेते जोपर्यंत माफी मागत नाही तोवर त्यांनी देखील स्वतःची नैतिकता दाखवून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती कार्यक्रमांमध्ये कुठल्याही प्रकारे सहभागी होता कामा नये, तसेच या महाराष्ट्र द्रोही भाजपाच्या नेत्यांना ज्या महाराष्ट्रातील मायबाप जनतेने निवडून विधानसभा व लोकसभेमध्ये पाठविले त्याच लोकसभेमध्ये या महाराष्ट्र भूमी चा जर त्यांचेच नेते अवमान करत असतील व ते देखील मूग गिळून गप्प बसत असतील तर त्यांच्यापेक्षा दुर्दैवी आज कोणी नाही असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. अशा महाराष्ट्र द्रोही भाजप नेत्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती महोत्सवामध्ये कुठल्याही प्रकारे सहभागी होण्याची नैतिकता नाही. जर भाजपाचे नेते छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सवामध्ये सहभागी झाल्यास त्यांचा जाहीर निषेध व्यक्त केला जाईल
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/263793525775317