Home क्राईम शिरसोली येथील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये चोरी

शिरसोली येथील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये चोरी

0
138

जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूस प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील पद्मालय इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेचे कार्यालय फोडून संगणकासह कागदपत्रांचे नुकसान करत एकूण सुमारे ४८ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमालाचे नुकसान केल्याची घटना घडली आहे. या संदर्भात शुक्रवार ७ जुलै रोजी सकाळी १० वाजता आहे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

मिळालेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील पद्मालय इंग्लिश मीडियम स्कूल येथे ६ जुलै ते ७ जुलैच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी शाळेचे कार्यालय फोडून संगणकाचे नुकसान केले, तसेच कागदपत्रे फाडून फेकून दिली. असे एकूण ४८ हजार ५०० रुपये किमतीचे नुकसान केल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात शुक्रवारी ७ जुलै रोजी सकाळी १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात शर्टाने विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ही फिर्याद निषादराज रंगराव बारी (वय-२८) रा. शिरसोली यांनी दिली। पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल समाधान उत्तराकडे करीत आहे.


Protected Content

Play sound