लष्करात जायचे असेल तर मेहनती शिवाय पर्याय नाही – कॅप्टन राहुल पाटील

जळगाव-लाइव्ह ट्रेंड्स न्यूस प्रतिनिधी । ज्या विद्यार्थ्यांना लष्करामध्ये करिअर करायचे असेल, देशसेवा करायची असेल, त्या विद्यार्थ्यांना मेहनत ही करावीच लागणार आहे. त्याला दुसरा कुठलाही पर्याय नाही, असे मत मणिपूर येथील गोरखा बटालियनचे कॅप्टन राहुल पाटील यांनी व्यक्त केले.

 

ए.टी झांबरे माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या संधी या उपक्रमांतर्गत  लष्करातील करिअरच्या संधी  या विषयावर मणिपुर गोरखा बटालियनचे कॅप्टन आणि शाळेचे माजी विद्यार्थी राहुल पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

 

लष्करात विद्यार्थ्यांना कोणकोणत्या संधी आहेत तसेच त्यासाठी शारीरिक मानसिक, बौद्धिक या दृष्टीने कशी तयारी करावी लागते? त्याचबरोबर लष्करात प्रवेश केल्यावर आणखी कोणकोणत्या संधी असतात त्यासाठी कोणकोणती तयारी करावी लागते? याविषयीचे सविस्तर मार्गदर्शन पीपीटी प्रेझेंटेशन आणि व्हिडिओज च्या माध्यमातून कॅप्टन राहुल पाटील यांनी स्पष्ट केले तसेच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या शंकांचे निरसन केले. कार्यक्रमात दहावीच्या विद्यार्थ्यांबरोबरच एनसीसीच्या विद्यार्थिनी एन.सी.सी.च्या विद्यार्थिनी सहभागी झाल्या.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए.एन.पाटील यांनी केले तर आभार पर्यवेक्षक नरेंद्र पालवे यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आर.एन.तडवी, डी.बी.चौधरी, अनिल शिवदे यांनी सहकार्य केले.

Protected Content