बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच ! : मुख्यमंत्री

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने ट्विटच्या माध्यमातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने ट्विट केले आहे. आपल्या ट्वीटमध्ये एकनाथ शिंदे यांनी नमूद केले आहे की, ”बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच. विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाशिवाय विचार नाही. गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादन.” याबरोबरच त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटोही शेअर केला आहे.

उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंडाचा पवित्रा घेतल्यापासूनच एकनाथ शिंदे यांनी सातत्याने आपण बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी एकनिष्ठ आहोत, अशी भूमिका घेतली आहे. शिंदे गट देखील आजवर वारंवार हीच भूमिका घेतांना दिसून येत आहे. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतानाही एकनाथ शिंदेंनी बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतलं होतं. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानेही मुख्यमंत्री शिंदे यांनी बाळासाहेबांना अभिवादन केले आहे. तसेच. ते आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला आणि आनंद दिघे यांच्या आश्रमाला भेट देत अभिवादन करणार आहेत.

Protected Content