जळगाव, प्रतिनिधी । भाजपा मेहरूण मंडल क्र. ८ तर्फे, आदित्य हॉटेल चौक, रामेश्वर कॉलनी परिसर, प्रभाग क्र. १४ मध्ये मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात, पहिले वर्ष पूर्ण झाले असून, भाजपा वर्षपूर्ती अभियान राबवत आहे. त्यानिमित्ताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे माहिती पत्रक व तसेच आमदार सुरेश दामू भोळे यांनी उपलब्ध करून दिलेल्या रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या होमोयोपॅथी गोळ्याचे ९०० नागरिकांना मोफत वाटप करण्यात आले.
केंद्र सरकारचा वर्षपूर्ती अभियानप्रसंगी जळगाव शहराच्या महापौर सौं. भारतीताई सोनवणे, भाजपा जिल्हा महानगर अध्यक्ष दिपकभाऊ सूर्यवंशी, वर्षपूर्ती अभियान संयोजक महेश जोशी, सहसंयोजक राहुल वाघ उपस्थित होते. तसेच उपगटनेते राजेंद्र घुगे पाटील, जेष्ठ नगरसेवक सदाशिवराव ढेकळे, नगरसेवक कैलासआप्पा सोनवणे, मंडल अध्यक्ष विनोद मराठे, मंडल संयोजक महादू सोनवणे, सहसंयोजक रमेश मोर्या, मंडल सरचिटणीस दिपक बाविस्कर, मंडल उपाध्यक्ष उमेशभाऊ सोनवणे, सुनील पाटील, निलेश घुगे पाटील उपस्थित होते. यांच्यासह सक्रिय कार्यकर्ते किशोर वाघ, गजानन वंजारी, बूथ प्रमुख, गणेश मोर्या, दिनेश ढाकणे, आकाश पारधे, मंडल सोशल मीडिया प्रमुख राहुल गुंजाळ आदी उपस्थित होते.