अवैध गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईसाठी दाम्पत्याचे उपोषण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील गिरणा नदी पात्रातून बेसुमार अवैध वाळूसह गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या गावगुंडांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी भडगाव तालुक्यातील भट्टगाव येथील लहू ठाकरे हे सपत्नीक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले असून मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, भडगाव तालुक्यातील भट्टगाव, पुनगाव, बांबरुड येथील गिरणा नदी पात्रातून बेसुमार वाळूची चोरटी वाहतूक होत आहे. गिरणा काठावरून मुरूम काढून ट्रॅक्टर विक्री केली जात आहे. त्यामुळे रस्त्यांवर मोठमोठे खड्डे देखील पडले आहे. वाळूची चोरटी वाहतूक करणारे कल्पेश सुनील परदेशी, शुभम बन्सीलाल परदेशी, जिभाऊ वना कोळी, रुपेश सुमेरसिंग परदेशी, जितेंद्र सुमेरसिंग परदेसी, सोनू ईश्वर सुरवाडे, मनोज भाऊलाल परदेशी, शिवम गुजर, अतुल परदेशी, अविनाश सूर्यकांत नाईक, हेमराज भरत कोळी, आकाश राजू गुजर, प्रतीक सहदेव बागुल, अमोल जाधव, चंदू मदन परदेशी, सतीश पाटील, भालचंद्र सांडू पाटील हे गिरणा नदी पात्रातून चोरटी गौण खनिज वाहतूक करत आहे. अवैध गौण खनिज वाहतूकीसाठी भट्टगावचे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांचा देखील पाठिंबा आहे. २५ मे रोजी पोलिसात तक्रार देण्यासाठी गेले असता पुनगावचा ग्रामपंचायत सदस्य पिल्लू आप्पा याने पोलिस ठाण्याच्या आवारात मारण्याची धमकी दिली आहे व अनिल पगारे याने बेदम मारहाण केली.

दरम्यान भट्टगावची ग्रामपंचायत बरखास्त करावी आणि गावगुंडांची चौकशी करून कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी लहू गुलाब ठाकरे आणि त्यांची पत्नी द्वारकाबाई लहू ठाकरे यांनी बुधवार २२ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहे.

Protected Content