भाजपमध्ये येण्यासाठी १०० कोटींची ऑफर ! : आ. शशिकांत शिंदे यांचा गौप्यस्फोट

सातारा | आपण ईडी आणि आयटीच्या बापालाही घाबरत नसल्याचे सांगतानाच भाजपमध्ये येण्यासाठी आपल्याला १०० कोटी रूपयांची ऑफर देण्यात आली होती असा दावा राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केला आहे.

भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडून भाजपात यावं म्हणून मला १०० कोटी रुपयांची ऑफर दिली होती, असा आरोप शशिकांत शिंदे यांनी खळबळ उडवून दिली आहे. सातारा जिल्ह्यातील कट्टापूर येथे बोलतांना त्यांनी भाजपवर जोरदाी टीकास्त्र सोडले.

शशिकांत शिंदे म्हणाले, भाजपाला, ईडी आणि बाकी सीडीला पळवून लावणारे कुणी कार्यकर्ते असतील तर ते आमच्यासारखे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. मध्यंतरी किरीट सोमय्या येथे आले होते. मी अजित पवार यांना सांगितलं होतं मला परवानगी द्या. त्यांचा एकदा तोतरेपणा बाहेर काढतो की नाही बघा, पण अजित पवार यांनी मला नको म्हणून सांगितलं. आपण परिणामांचा विचार करत नाही. आपण ईडीच्या बापाला घाबरत नाही आणि आयकर विभागाच्या बापालाही घाबरत नाही, असंही मत शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

Protected Content