जळगाव, प्रतिनिधी । येथील भाऊसाहेब राऊत विद्यालयात आज महिला शिक्षण दिन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.
महिला शिक्षण दिन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने विद्यालयाचे मुख्याध्यापक एल. एस. तायडे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण केले. याप्रसंगी पर्यवेक्षक एस. एम. रायसिंग, अरुणकुमार बाविस्कर, प्रकाश मेंढे, राजेश जाधव, धनराज सोनवणे व सागर हिवराळे यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्याध्यापक एल. एस. तायडे यांनी. महिला शिक्षण दिनाविषयी तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी सविस्तर माहिती दिली. सूत्रसंचालन राजेश जाधव यांनी तर आभार धनराज सोनवणे यांनी मानले.