चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव म्हाळसा येथे उघड्या घरात प्रवेश करून चोरट्यांनी सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ३२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार सायंकाळी ५.३० वाजता उघडकीला आला याबाबत मेहुनबारे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, उमेश वीरभान पाटील (वय 41 राहणार पिंपळवाड म्हाळसा ता.चाळीसगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. २८ मे रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास त्यांच्या उघड्या घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून घरातील पत्राच्या पेटीत ठेवलेले सोन्याचे व चांदीचे दागिने असा ऐकुण १ लाख ३२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर उमेश पाटील यांनी मेहुणबारे पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रकाश कोळी करीत आहे.