Home क्राईम वृध्द महिलेची सोनसाखळी लांबविणाऱ्या चोरट्याला सुप्रिम कॉलनीतून अटक

वृध्द महिलेची सोनसाखळी लांबविणाऱ्या चोरट्याला सुप्रिम कॉलनीतून अटक

0
101

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । खामगाव येथून वृध्द महिलेची सोनसाखळी लांबविणाऱ्या प्रशांत उर्फ चोर बाप्या पंडित साबळे (वय-३१, रा.सुप्रीम कॉलनी जळगाव) या चोरट्याला सोमवार १२ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता एमआयडीसी पोलिसांनी सुप्रीम कॉलनी परिसरातून अटक केली आहे. असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

एमआयडीसी पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील केशवनगर येथे शोभाबाई सुभाषराव खैरे (वय-६५) या वृद्ध महिला ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता खामगाव शहरातील आईसाहेब मंगल कार्यालयासमोरून पायी जात असताना दोन चोरट्यांनी दुचाकीवर येऊन त्यांच्या गळ्यातील २० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन धूमस्टाईल लांबवल्याची घटना घडली होती. या संदर्भात खामगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान ही सोन्याची चैन लांबविणाऱ्या संशयित आरोपी प्रशांत उर्फ चोर बाप्या पंडित साबळे हा सुप्रीम कॉलनीत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार खामगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल नीलसिंग चव्हाण यांच्यासह एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ गणेश शिरसाळे, अल्ताफ पठाण, पोलीस नाईक विकास सातदिवे, किशोर पाटील, योगेश बारी, सचिन पाटील, छगन तायडे, राहुल रगडे, किरण पाटील, मुकेश पाटील यांनी कारवाई करत सोमवार १२ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता संशयित आरोपी प्रशांत साबळे याला अटक केली आहे. त्याला पुढील कारवाईसाठी बुलढाणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.


Protected Content

Play sound