भरघोस उत्पन्न्नाकरिता खत व पाण्याचे व्यवस्थापन योग्य वेळी करा – डॉ. संजय पाटील

पाचोरा  – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पिंप्री बु” प्र. पा. येथे राज्य शासनाचा कृषी विभाग व गावकऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने मोसंबी फडगर नियंत्रण व उपाययोजना यावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

 

कार्यशाळेत मराठवाडा विद्यापीठाचे बदनापूर येथील शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी मोसंबी पिकाचे भरघोस उत्पन्न व चांगला भाव मिळण्यासाठी खत व पाण्याचे योग्य वेळी व्यवस्थापन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. ते पुढे म्हणाले की,  नियोजन योग्य वेळी झाल्यास शेतकऱ्यास चांगल्या प्रकारे उत्पन्न येऊन योग्य भावही मिळेल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय कृषी अधिकारी नंदकिशोर नयनवाड तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ममुराबाद केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. हेमंत बाहेती, तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव, माजी जिल्हापरिषद सदस्य उद्धव मराठे, आत्माचे अध्यक्ष रमेश बाफना, मंडळाधिकारी संजय मोहिते, पर्यवेक्षक के. एफ. पाटील हे होते. मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, मोसंबी पिक व्यस्थापणात सुधारणा होणे गरजेचे असून नत्राचा योग्य पुरवठा होणे, दोन झाडांमध्ये योग्य अंतर, फळांची विरळती, बुरशी नाशक, किटक नाशक यांचा समतोल राखल्यास शेतकऱ्यास योग्य उत्पन्न मिळुन चांगली शेती केल्यास शेतकऱ्यांच्या पाल्यांना नोकरी शोधण्याची गरज भासणार नाही.

यावेळी डॉ. बाहेती यांनी सांगितले की, मोसंबीच्या रोपांच्या लागवडीपासून ते काढणी पर्यंत वेगवेगळ्या तंत्राचे ज्ञान आत्मसात करणे गरजेचे असून यामुळे गुणात्मक उत्पादनात मोठी भर पडून ज्यामुळे फळांची भरघोस वाढ होऊन मोसंबीच्या फळांना चांगला भाव मिळू शकतो. भरघोस उत्पादनासाठी दोन ओळींमध्ये सरी पडून पाण्याचा निचरा होणे गरजेचे आहे. यावेळी बाजार समितीचे माजी संचालक नरेंद्र पाटील, सरपंच पती रणजित राजपूत, अण्णा परदेशी, डॉ. राजेंद्र पाटील, कृषी कवी धोंडीराम हर्णे, शरद पाटील, कृषी सहाय्यक सुनिल पाटील, संदिप चौधरी, किशोर पाटील, अमोल भोई, विद्या पानपाटील, सचिन भैरव, चेतन बागुल, संतोष चव्हाण, निश्चित देवरे सह मोठ्या संख्येने नागरिक व परिसरातील मोसंबी उत्पादक शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव, सूत्रसंचलन के. एफ. पाटील तसेच उपस्थितांचे आभार संजय मोहिते यांनी मानले.

Protected Content