भडगाव येथे वाळू चोरणा-या ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल 

 

भडगाव, प्रतिनिधी । शहरातील पाचोरा रोड लगत दादाजी धाब्याच्या पाठीमागील भागात वाळू साठवलेल्या थप्प्यावरून जेसीबीच्या साहाय्याने डंपर व ट्रॅक्टर मध्ये वाळू भरतांना महसूल विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले होते. त्यांच्यावर दि. २१ रोजी रात्री तहसीलदार माधुरी आंधळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील पाचोरा रोडवरील दादाजी धाब्याच्या मागे वाळू साठ्यावरून जेसीबी च्या साहाय्याने वाळू भरतांना भडगाव व पाचोरा महसूल विभागाच्या पथकाने डंपर क्र एम. एच. १९-सी वाय ५४२६ टाटा कंपनीची हायवा ढंपर व पिवळ्या रंगाचे जेसीबी क्र एमएच १९ सिजे ०९४४ व निळे सोनाली कंपनीचे विना क्रमांक, चेसेस क्रमांक बी. झेड. व्ही एस.जी. ७०२६४९ एस ३ हे ट्रॅक्टर रंगेहाथ पकडले होते. त्यांच्यावर २१ रोजी रात्री भडगाव तहसीलदार माधुरी संपतराव आंधळे. रा बाळद रोड, भडगाव यांच्या फिर्यादीवरून डंपर चालक प्रदीप भाऊसाहेब साळुंखे, ट्रॅक्टर चालक रवींद्र किसन मोरे, जेसीबी चालक योगेश देविदास पाटील, डंपर व जेसीबी मालक अविनाश पुंडलिक अहिरे, ट्रॅक्टर मालक सम्राट विश्वनाथ वाघ राहणार सर्व टोणगाव, भडगाव. यांच्या विरुद्ध भडगाव पोलिस स्टेशनला भादवि कलम ३७९, ३४ प्रमाणे दि २१ रोजी रात्री गुन्हा नोंद करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोहेकाॅ किरण ब्राम्हणे हे करीत आहेत.

महसूल विभागाच्या  कार्यवाहीत घटनास्थळी जेसीबी, ढंपर, ट्रॅक्टर, ७ ब्रास वाळू असा ६० लाख २६ हजार , ९१५ रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.  ही कार्यवाही भडगाव तहसीलदार माधुरी आंधळे, वाहन चालक विष्णू तायडे, पाचोरा तलाठी कैलास बहीर, आर. डी. पाटील, मयुर आगरकर, दीपक दवंगे यांच्या पथकाद्वारे करण्यात आली होती.

Protected Content