जळगाव प्रतिनिधी । आज सकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात सात रूग्ण पॉझिटीव्ह आले असून हे सर्वच्या सर्व भडगाव येथील असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाने आज रात्री एका प्रेस नोटच्या माध्यमातून कोरोना बाधीतांची माहिती जाहीर केली आहे. यानुसार-रावेर, भडगाव, धरणगाव येथे स्वॅब घेतलेल्या 64 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी 57 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 7 व्यक्तीचे तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.
पाॅझिटिव्ह आढळलेल्या सातही व्यक्ती भडगाव येथील आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 499 इतकी झाली आहे. भडगावात अनेक दिवसांपर्यंत कोरोनाचा संसर्ग आढळून आला नव्हता. तथापि, अलीकडच्या काही दिवसांमध्ये येथे मोठ्या प्रमाणात रूग्ण आढळून येत आहेत. विशेष करून, एका सरकारी उच्चपदस्थ अधिकार्याच्या वडिलांच्या अंत्ययात्रेतून मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग पसरल्याचे निष्पन्न झाले आहे. गत काही दिवसांमध्ये येथे कमी प्रमाणात रूग्ण आढळून आले होते. तथापि, आज सकाळी एकाच वेळी सात रूग्ण आढळून आल्याने येथील कोरोनाचा संसर्ग वाढल्याचे दिसून येत आहे.