जळगाव प्रतिनिधी । भाजपचे गटनेते भगत बालाणी यांनी आपल्या पक्षाच्या भूमिकेच्या विरूध्द जात सुरेशदादा जैन यांच्या निर्दोषत्वाची ग्वाही देत त्यांनी चांगली कामे केल्याचे सत्य अखेर जनतेसमोर कबूल केले. यामुळे महानगर शिवसेनेतर्फे त्यांचा उद्या महापालिकेत शाल, श्रीफळ आणि ५०१ रूपये देऊन सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती आज शिवसेनेच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. याप्रसंगी विरोधी पक्षनेते सुनील महाजन, गटनेते बंटी जोशी आणि महानगराध्यक्ष शरद तायडे उपस्थित होते. या परिषदेत जोशी आणि महाजन यांनी बालाणी आणि भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले.
भाजपचे गटनेते भगत बालाणी यांनी कालच्या पत्रकार परिषदेत शिवसेनेवर टीका केली होती. मात्र याप्रसंगी त्यांनी घरकूल प्रकरणातून सुरेशदादा जैन आणि खान्देश बिल्डर्स निर्दोष सुटणार असल्याचे आश्चर्यकारक विधान केले होते. या पाश्वर्र्भूमिवर, आजच्या पत्रकार परिषदेत बंटी जोशी म्हणाले की, भगत बालाणी यांनी आमचे नेते सुरेशदादा जैन हे निर्दोष असल्याची ग्वाही दिल्यामुळे महानगर शिवसेनेतर्फे आम्ही त्यांचा उद्या महपालिकेत शाल, श्रीफळ आणि पाचशे एक रूपये देऊन सत्कार करणार आहोत. बालाणी यांनी हा सत्कार स्वीकारण्यासाठी उपस्थत रहावे असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, बालाणी यांनी सुरेशदादा जैन हे आपल्या ४० वर्षाच्या कारकिर्दीत तर प्रदीप रायसोनी हे २८ वर्षाच्या कारकिर्दीत सभागृहात कमी प्रमाणात बोलले असल्याचा उल्लेख केला होता. यावर अनंत जोशी म्हणाले की, बालाणी हे स्वत: सुरेशदादा आणि प्रदीपभाऊंनी केलेल्या कामांची वाखाणणी करतात. मग त्यांनी स्वत:च्या राजकीय आयुष्यात जळगावात कोणता ठसा उमटवला याची माहिती द्यावी असे आवाहन बंटी जोशी यांनी केले.
विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी याप्रसंगी बालाणी आणि भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. आपण माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची उद्या भेट घेऊन गेल्या ३० वर्षात शेण खाणार्यांबाबत चर्चा करणार असल्याची माहितीदेखील सुनील महाजन यांनी दिली.
खाली पहा : भगत बालाणी यांच्यावर टीका करणार्या महानगर शिवसेनेच्या पत्रकार परिषदेचा व्हिडीओ.
https://www.facebook.com/508992935887325/videos/247474226276672