एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयात अंगणवाडी सेविका पदासाठी भरती

जळगाव (प्रतिनिधी) एकात्मिक बाल विकास सेवा, जळगाव योजनेंतर्गत जळगाव खुर्द येथील एक अंगणवाडी सेविका पद रिक्त आहे. या पदासाठी ईच्छूक महिलांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सेविका पदासाठी शैक्षणिक पात्रता ही दहावी पास असून महिला उमेदवार ह्या जळगाव खुर्द येथील रहिवासी असणे आवश्यक आहे.

 

सेविका पदासाठी अर्ज भरण्यापूर्वी महिला उमेदावारांनी ग्रामसेवकांकडील रहिवासी दाखला घेणे आवश्यक आहे. सेविका पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या महिला उमेदावारांचे वय 1 मार्च, 2020 रोजी 21 ते 30 दरम्यानचे असावे. अर्ज विक्री 17 ते 31 मार्च दरम्यान होणार असून अर्जासाठी रुपये 10 एवढे नाममात्र शुल्क आकारण्यात येईल. अर्ज स्विकृती 18 मार्च ते 1 एप्रिल, 2020 पर्यंत बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मीक बाल विकास सेवा योजना, जळगाव यांचे कार्यालयात समक्ष सादर करावेत. असे बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मीक बाल विकास सेवा योजना, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Protected Content